२००२ बॉम्बस्फोटातील आरोपीला ठाण्यात अटक



२००२ बॉम्बस्फोटातील आरोपीला ठाण्यात अटक






ठाणे:

बांगलादेशमध्ये २००२ साली मशिदीत आणि मशिदीबाहेर झालेल्या एकूण तीन बॉम्बस्फोटातील आरोपी मोफाज्ज्ल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफीजुल केराअली मंडल याला ठाणे गुन्हे शाखेने ठाण्यातून अटक केली आहे.या बॉम्बस्फोटात एक ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. तसंच आरोपीच्या हातात एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. यात आरोपीचा उजवा हात तुटला होता. या प्रकरणी आरोपीला बांगलादेश उच्च न्यायालयानं २००४ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती.परंतु, २००४ मध्ये आरोपीला वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला होता. त्यानंतर तो फरारी झाला. तेव्हापासून तो पश्चिम बंगालमध्ये मफीजुल केराअली मंडल या नावाने राहत असे. बिगारी तसेच मजुरीचे काम करणारा हा आरोपी कामासाठी मुंबई, नवी मुंबई येत असे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image