महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे गोदरेजने केले 1 लाख हॅण्डवॉश सुपुर्द

महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे गोदरेजने  केले 1 लाख हॅण्डवॉश सुपुर्द


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हस्तांदोलन न करता नमस्कार करावा : महापौर


 ठाणे


: कोरोना या संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी सतत हात हॅण्डवॉशने स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी  गोदरेज कंपनीकडे हॅण्डवॉश उपलब्ध करुन देण्याबाबत केलेल्या मागणीनुसार आज गोदरेज कंपनीच्या प्रोटेक्ट इंडिया मूव्हमेंटने महापौर यांच्याकडे आज महापालिका कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख हॅण्डवॉश सुपुर्द केले. यावेळी कोरोनापासून स्वत:ची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात एकमेकांशी हस्तांदोलन न करता पारंपारिक पध्दतीने हात जोडून नमस्कार करावा असे आवाहन देखील महापौरांनी यावेळी केले. यावेळी सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक उमेश पाटील, सुधीर कोकाटे, नगरसेविका अनिता गौरी, उपायुकत संदीप माळवी, गोदरेज मूव्हमेंट इंडिया सार्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल कटारिया, गोदरेज ग्रुपचे व्हीपी ब्रॅड कम्युनिकेशनचे सुजीत पाटील आदी उपस्थीत होते.


          महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, या व्हायरसचा सामना करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरात स्वचछता ठेवण्यासाठी दररोजी महापालिकेचे सफाई कर्मचारी हे काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांनी देखील स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असून यासाठी प्रत्येकाने आपले हात हॅण्डवॉश अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र बाजारात मिळणारे महागडे हॅण्डवॉश व सॅनिटायझर विकत घेणे न परवडण्यासारखे असते. यासाठी गोदरेज प्रोटेक्ट इंडियाने मि.मॅजिक ही हॅण्डवॉश तयार करणारी पावडर बाजारात आणली असून ही पावडर 200मि.ली पाण्यात मिसळून हॅण्डवॉश सहज तयार करता येते व हे विकत घेणे सुध्दा सर्वांना परवडण्यासारखे असल्याचे गोदरेजचे सुनील कटारिया यांनी नमूद केले. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात महापौर कार्यालयातील कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना गोदरेज प्रोटेक्ट इंडियाने दिलेल्या हॅण्‌डवॉशचे वाटप करण्यात आले. गोदरेजने पुढाकार घेतल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार व्यकत केले.          कोरोनाबाबत शासनासह महापालिका यंत्रणा देखील सज्ज झाली असून प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. यासाठी दैनंदिन जीवनात संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना हस्तांदोलन न करता नमस्कार करावा असे देखील महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.