ठाण्यात 14 बगळे मृतावस्थेत सापडले, बर्ड फ्लूच्या भीतीने मुंबईकरांचीही धाकधूक वाढली

 

ठाणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ठाण्यात तब्बल 14 पक्षी मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे (14 Duck found dead in Thane). या पक्षांचा बर्ड फ्लूने तर मृत्यू झाला नाही ना, अशी शंका स्थानिकांना सतावत आहे. एकाच वेळी इतके पक्षी मृतावस्थेत आढळल्याने मुंबईकरांचीही धाकधूक वाढली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरत असताना बर्ड फ्लू्च्या नव्या संकटाने भारतात शिरकाव केल्याने केंद्र सरकार आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलात बुधवारी (6 जानेवारी) मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे काही बगळे मृतावस्थेत आढळून आले. अनेक पक्षी एकाच वेळी मृत सापडल्याने काहीतरी गंभीर कारण असल्याचे त्यांना जाणवले. नागरिकांनी एकत्र येत हे पक्षी गोळा केले तर तब्बल 14 पॉंड हेरॉन जातीचे बगळे मृत झालेले आढळून आले. साधारणतः पाणवठ्याच्या आसपास हे पक्षी आढळून येतात. ते उंच झाडांवर आपली घरटी बनवतात. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील अनेक शहरात अनेक पक्षी अचानक मृत्यमुखी पडले असून यामागे बर्ड फ्लूचे विषाणू असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे अधिकृत माहिती नसल्याने सदरचे सर्व पक्षी कशामुळे मेले, यावर उलटसुलट चर्चाना उधाण आलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत पक्षी ताब्यात घेतले असून मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ठाणे पालिका उपायुक्त संदिप माळवी यांनी दिली आहे. 



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image