अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेचा मोर्चा डॉमिनोजकडे

 

मुंबई: मराठीत व्यवहार करण्याच्या मुद्द्यावरून जगप्रसिद्ध अ‍ॅमेझॉनला (Amazon) धडा शिकवल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता आपला मोर्चा पिझ्झा (Pizza) आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे (Dominos) वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. 

डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन डॉमिनोजने मनसेला पत्राद्वारे दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेने अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. सुरुवातीला मनसेने पत्रं, इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्द्याचा पाठपुरावा केला. मात्र, अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसेच प्रचंड आक्रमक झाली होती.

त्यानंतर मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अ‍ॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनने शरणागती पत्कारत सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. हा सर्वप्रकार पाहता डॉमिनोजने अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्कारल्याचे चित्र दिसत आहे.

डॉमिनोज मराठी अ‍ॅप सुरू करणार

अ‍ॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत अ‍ॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरु केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरुप धारण केले होते. मनसेकडून (MNS) मुंबईभरात अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले होते.. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला होता.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image