भिवंडी : एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडी येथे घडली. बॉयफ्रेंडसोबत आपल्या पत्नीचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भिवंडीतील व्यक्तीने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
रफीक मोहम्मद युनूस असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने हत्या केल्यानंतर पोलीसांकडे आत्मसमर्पण केले. युनूस दाम्पत्य भिवंडीतील अन्सार नगर भागात आपल्या तीन मुलांसोबत राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे झालेल्या लॉगडाऊनमुळे पावर लूममध्ये काम करणाऱ्या रफीकची नोकरी गेली. त्यामुळे बेरोजगार झालेल्या रफीला सोडून त्याची पत्नी नसरीन आपल्या मुलासोबत आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेली. ती भिवंडी येथील नागाव भागातच राहायला आहे.
पोलिसांनी सांगितले की, रफीकने आपल्या पत्नीचा न्यूड व्हिडिओ तीच्या बॉयफ्रेंड सोबत पाहिला. सद्दाम असे पत्नीच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याने नसरीनला जाब विचारण्यासाठी गेला. त्यावेळी त्यांचा वाद झाला. त्यानंतर रफीक याने आपल्याकडील चाकूने तिला भोकसले, यात नसरीन गंभीर जखमी झाली. त्यानंतर रक्ताच्या थारोळात तिचा मृत्यू झाला.