" अर्थ स्वार्थ " लघु चित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कँमेरा डिजिटल गौरव पुरस्कार..!


आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित 

अर्थ स्वार्थ या सामाजिक लघु चित्रपटास

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ आणि ११वा दादासाहेब फाळके गोल्डन कँमेरा २०१९ आणि NIFF पुरस्कृत नुकताच दादासाहेब फाळके गोल्डन कँमेरा डिजिटल गौरव पुरस्कार मिळाला असून संपूर्ण मुंबई शहरांत या लघू चित्रपटांतील सर्व कलावंत.. तंत्रज्ञ आदी सर्व सहकलावंतांचे कौतुक केले जात आहे. एका ज्वलंत समस्येवर आधारित..कौटुंबिक कलहाचे विदारक सत्य मांडणारा "अर्थ स्वार्थ " या सामाजिक लघू चित्रपटात थोडक्यात काय तर मुंबईतील वास्तव्य असलेल्या हसऱ्या घरकुल मध्ये जेव्हा उत्तुंग इमारतीचा शिरकाव होतो तेव्हा पैशांसाठी भावाभावात होणारे वाद, वडिलोपार्जित संपत्ती साठी होणारी जिवघेणी भांडणे विकोपाला जातात आणि यांत भरडली जाते ती बुजुर्ग व्यक्ती जिने स्वतः हालअपेष्टा आपल्या मुलांसाठी काढलेल्या असतात पण त्याचा मुलांना विसर पडलेला असतो, लहानपणी एकमेकांना जीव लावणारी भावंडे मोठी झाल्यावर केवळ पैशांसाठी , स्वार्थासाठी एकमेकांच्या जीवावर कशी उटतात आणि याचा शेवट काय होतो ते याचे विदारक चित्र "अर्थ स्वार्थ " या मराठी सामाजिक लघू चित्रपटांत https://youtu.be/Ya-e9VhUow0 या लिंक वर आपणांस नक्की पहायला मिळेल...  या लघू चित्रपटांत सुप्रसिद्ध अभिनेते अनंत सुतार आणि अचला (माई) पांचाळ यांच्यासोबत रूपेश पालव , गणेश राजणकर , देवेंद्र पवार , वनिता गरुड , मानसी परब , रवीना सोनावणे , विशाल म्हसकर , सचिन सावंत , रघुनाथ खजूरकर यांचा सहभाग असून सहदिग्दर्शन राम माळी यांचे आहे.आणि संकलन आणि संगीत सुनील म्हात्रे (अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ) यांचे लाभले असून एकंदरीत हा लघू चित्रपट सध्याच्या परिस्थितीवर बेतला आहे.

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image