दुबई : आयपीएलच्या १३व्या (IPL2020) मोसमातील अंतिम सामना (IPL 2020 Live) आज (10 नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. मुंबईला पाचव्यांदा तर दिल्लीला पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.