शहरातील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावेत

शहरातील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावेत


महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांचे आदेश



ठाणे


ठाणे शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची पाहणी करुन धोकादायक स्थितीत असलेले जाहिरात फलक तात्काळ निष्काषित करावेत तसेच व अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या  जाहिरात फलकांवर त्वरीत  कारवाई  करावी असे आदेश  महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.          काल नवीमुंबई क्षेत्रात कल्याण शीळ मार्गावरील दिशादर्शक फलक कोसळल्याची घटना घडण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी  हे आदेशदिले आहेत. ठाणे शहरात अशा घटना घडून कोणतीही जीवितहानी होवू नये यासाठी शहरातील सर्व होर्डिंग्ज व दिशादर्शक फलकांची पाहणी करुन जे जाहिरातफलक धोकादायक स्थितीत आहेत ते जाहिरातफलक निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.          पावसाळ्यात वादळी वा-यामुळे मोठे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता आहे.  ठाणे शहरातही पूर्वद्रुतगती मार्ग तसेच शहरातील विविध ठिकाणी जाहिरात फलकांची पाहणी करावी तसेच त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकही तात्काळ हटविण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी जाहिरात विभागाला दिल्या आहेत.    


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image