राजगृहावरील हल्ला: ठाण्यात वंचितची निदर्शने
राजगृहावरील हल्ला: ठाण्यात वंचितची निदर्शने


 ठाणे

 

राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी माथेफिरुंनी हल्ला केला आहे. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच, जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊ खर्‍या सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.यावेळी राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले की,   बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात.असे असतानाही जर हल्ला होत असेल तर त्यामागे मोठा कट असण्याची शक्यता आहे. पकडण्यात आलेला इसम हा खरोखरच माथेफिरु आहे की सराईत गुन्हेगार आहे, हे सरकारने जाहीर केले पाहिजे. कारण, बाबासाहेबांच्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेला हा इसम एक प्यादा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहखात्याने सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये किसन पाईकराव, राजू चौरे, अमोल गौलेर, हरीष यादव, अमोल पाईकराव, संदीप शेळके, गोपाळ विश्वकर्मा , अमर आठवले, जितेंद्र आडबले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image