" शाखा तिथे दवाखाना " या लोकउपयोगी कार्यक्रमाचा शुभारंभ
ठाणे
युवा सेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना आमदार श्री. प्रताप सरनाईक साहेब व युवासेनेचे राष्ट्रीय सचिव श्री. पूर्वेशजी सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणेकर व मिरा भाईंदरकर जनतेसाठी " शाखा तिथे दवाखाना " या अत्यंत महत्वपूर्ण उपक्रमाला आजपासून सुरवात करण्यात आली आहे. शिवसेना आमदार श्री. प्रताप सरनाईक साहेब व युवानेते श्री. पूर्वेशजी सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणेकर व मिरा भाईंदरकर जनतेला दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत या उपक्रमाला सुरवात झाली असून, जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शहरीराचे तापमान तपासणीचे यंत्र तसेच Oxygen level तपासण्यासाठी सुद्धा एक एक यंत्र प्रत्येक शाखेत उपलब्ध करण्यात आले असून त्या द्वारे लोकांची तपासणी करण्यात येत आहे.त्याच सोबत ज्या गोळ्या डॉक्टरांच्या Prescription शिवाय सामन्यात दिल्या जातात उदा - व्हिटॅमिन, प्रोटीन, सर्दीची ची औषधें ती देखील सरनाईक साहेबांच्या वतीने लोकांना मोफत देण्यात येत आहेत.
या शिबिरात तपासणीला येणाऱ्या लोकांना Sanitizer व मास्क मोफत देण्यात येतं आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Social Distancing ची विशेष काळजी घेऊन हा उपक्रम सुरु आहे, तसेच तपासणी करणाऱ्या मेडिकल अधिकाऱ्याला संपूर्ण Ppe देण्यात आले आहेत.
लोकांचा उदंड प्रतिसाद व आशीर्वाद
"शाखा तिथे दवाखाना " या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून लोकांनी या शिबिरात तपासणी करायला रिघ लावली आहे. इतकंच नव्हे तर Lock down पासून सतत सुरु असलेल्या लोकसेवे बद्दल लोक सरनाईक साहेबांना भरभरून आशीर्वाद देतं असल्याचे पाहायला मिळते.