संपत्तीधारक माजी आमदार खासदारांची पेन्शन योजना त्वरित बंद करा- बीआरएसपी
 सर्व सामान्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी बीआरएसपीचे ठाण्यात आंदोलन


ठाणे


 सर्व सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी तसेच दलितांवरील हल्ले-अत्याचार व तरुणांच्या हत्या यांच्या विरोधात निषेधार्थ  आणि आज २५ जुन रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   मूक प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. यामध्ये पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.  यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.  


२०२० कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्टया उध्वस्त गरजू परिवारास केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडातून अथवा विशेष पॅकेज अंतर्गत आगामी सलग दर तीन महिने पाच हजाराचे अर्थसहाय्य करावे. केंद्र सरकारने देशातील सर्व माजी आमदार /खासदार यांना क्रेमीलियरचे धोरण लावून एक कोटी पेक्षा जास्त संपत्तीधारक माजी आमदार खाजदारांची पेन्शन योजना त्वरित बंद करून तो निधी कोनोना वैद्यकीय सेवेसाठी वापरण्यात यावा. महाराष्ट्रातील समाजकल्याण व आदिवासीकल्याण मंत्रालयात विविध योजनांची प्रभावी व संपूर्ण निधीचा सदुपयोग करून कोरोना महामारीत दलित-आदिवासी कुटुंबाना आर्थिक सक्षमता प्रदान केली पाहिजे. गोरगरीब पालकांच्या विध्यार्थ्यांना शालेय फी अभावी शाळेत त्रास होऊ नये त्याकरिता शिक्षण संस्थानी अशा विद्यार्थ्यांना फी सवलत देऊन पुरेसा वेळ दयावा, यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसे आदेश काढावेत. इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. 


" alt="" aria-hidden="true" />


" alt="" aria-hidden="true" />



Popular posts
कचरावाहक घंटा गाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे.
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image