कळवा प्रभाग समिती क्षेत्रात पुढील आठ दिवस संपूर्ण 'लॉकडाऊन'
कळवा
कळवा प्रभागसमिती अंतर्गतकळवा,विटावा,खारेगाव विभागात गेल्या महिनाभरात कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने या परिसरात मंगळवार दि 30 जून ते 7 जुलै पर्यन्त संपूर्ण लॉकडाऊन केले जाणार आहे.या मध्ये औषधाची दुकाने व दुध डेअरी दिवसाआड सुरू राहणार असून भाजीपाला,किराणा मालाची दुकाने,चिकन,मटन ,मासळी बाजार आदी पुढील आठ दिवसांसाठी बंद राहणार आहेत
मागील महिन्याच्या 27 मे ला कळवा परिसरात चार दिवसांचा 'लॉकडाऊन'करण्यात आला होता तेव्हा कळवा प्रभाग समिती अंतर्गत रुगणांची संख्या 206 होती मात्र लॉकडाऊन स्थितील झाल्यावर नागरिकांनी नियम न पाळल्याने संपूर्ण रस्त्यावर व बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत असल्याने महिनाभरात रुगणांची संख्या 915 वर जाऊन पोहोचली आहे.या 915 रुग्णापैकी 423 रुग्ण बरे झाले असून 465 रुग्णांवर विविध कोव्हिडं रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे.म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने पुढील आठ दिवस लॉकडाऊन घोषित केला आहे.या लॉकडाऊन काळात उगाचच रस्त्यावर फिरणाऱ्या व वाहन चालविणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.