कोरोना काळात आरोग्यविम्याचे नियम सरकारने शिथील करावेत







कोरोना काळात आरोग्यविम्याचे नियम सरकारने शिथील करावेत - धनगर प्रतिष्ठानची आग्रही मागणी

 

ठाणे

 

 कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी खाजगी तसेच सरकारी आरोग्य विम्याचे नियम शिथिल करावेत.जसे की,कुणाही व्यक्तीचा आरोग्य विमा कोणत्याही कोरोना रुग्णाला उपयोगी पडु शकेल.अशी सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी.अशी आग्रही मागणी धनगर प्रतिष्ठानच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनादवारे केली आहे.

 

   सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने चांगलेच थैमान घातले असुन दररोज शेकडोना याची लागण होत आहे.यामुळे नागरिकांना उपचारासाठी जेथे बेड उपलब्ध होईल तेथे उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.परंतु ज्यांचे हातावर पोट आहे असे काही नागरिक आहेत कि,त्यांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही.अशा नागरिकांकडे आरोग्य विमा देखील नाही.अशा रुग्णांना पैशांची जमवाजमव करताना हाल होत आहेत.दरम्यान,या कोरोना काळात अनेकजण विविध मार्गाने मदत करत आहेत यादृष्टीने ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेने सरकारकडे अनोखी मागणी केली आहे.

 

त्यानुसार, जर एखादा खाजगी आरोग्य विमाधारक आपला आरोग्य विमा दुसऱ्या व्यक्तीला उपचारासाठी देऊ इच्छित असेल तर,सरकारने यासाठी परवनगी द्यावी.जेणेकरून नागरिकांना विनासायास उपचार मिळण्यात अडचण येणार नाही.सध्या खाजगी किंवा सरकारी आरोग्यविमा हा विमाधारक व त्याचा कुटुंबाला सुरक्षाकवच देतो.यासाठी प्रत्येक वर्षी यासाठी पैसे भरावे लागते. परंतु काहीजण वर्षानुवर्षे पैसे भरतात.परंतु,त्यांना कोणत्याही आजार होत नसल्याने त्याना या आरोग्य विम्याचा लाभ घेता येत नाही.किंबहुना, काही गर्भश्रीमंत मंडळी इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी लाखो रुपयाचे आरोग्य विमे काढतात.परंतु या विम्याचा फायदा फक्त विमाधारकालाच होतो. तेव्हा,एखादया गरजू रूग्णाला चांगला उपचार मिळावा या भावनेने आपला आरोग्य विमा दुसऱ्याला देण्याची एखाद्याची इच्छा असली तरी,सद्यस्थितीतील नियमावलीमुळे देऊ शकत नाही.कारण,तशी नियमात तरतूदच नाही.

 

या पार्श्वभूमीवर ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान ,ठाणे या संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन अशी विनंती केली आहे.त्यानुसार,जोपर्यंत कोरोना महामारी आहे, तोपर्यंत जर एखाद्या आरोग्य विमाधारकाला आपला विमा कोणत्याही गरीब कोरोना बाधीत रुग्णाला देऊ इच्छित असेल तर, त्याला सरकारने परवानगी द्यावी.तसे आदेश सरकारने पारित करावे जेणेकरून नागरिकांना या विमाच्या माध्यमातून अनेक गरजूना मदत करता येईल व मध्यमवर्गीय गरीब रुग्णाला चांगला उपचार मिळेल व सरकारी यंत्रणेवर भारदेखील थोडासा कमी होईल. अशी मागणी संस्थेच्यावतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

दरम्यान,धनगर प्रतिष्ठानच्या या मागणीच आवश्यक विचार करण्यात येईल.असे मुख्यमंत्री कार्यालय व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

 



 

 



 



 



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image