गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी साडेबारा लाखांची मागणी, गुन्हा दाखल

गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी साडेबारा लाखांची मागणी, गुन्हा दाखल


ठाणे


पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी साडेबारा लाखांची मागणी करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीस दलातील शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांच्यासह ओंकार पातकर, आकाश सावंत, सचिन रांजणे या खाजगी इसमांविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्याची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.


तक्रारदार यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये जामीन देण्यासाठी मदत केल्याबद्दल, त्याचबरोबर त्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी आणि त्यांचे गोठवलेले बँक खाते पूर्वरत सुरू करून देण्यासाठी व इतर ही मदत करण्यासाठी तक्रारदारांकडे 50 लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती 12 लाख 50 हजार देण्याचे ठरले. याचदरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबीत केलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ठाणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक नीलिमा कुलकर्णी या तपास करत आहेत.



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image