जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असणाऱ्या दुकांनावर कारवाई

जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असणाऱ्या दुकांनावर कारवाई



ठाणे


कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल  यांनी दिले असतानाही इतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या कळवा प्रभागसमितीमधील दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.   संचारबंदी सुरू असतानाही नागरिक या ना त्या कारणास्तव घराबाहेर पडत आहे. सोशलडिस्टन्सींग पाळत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असून त्यानुसार आज कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील खारेगाव येथे वास्तुआनंद सोसायटीतील साईकृपा किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स, पुनम सेल्स ॲण्ड सर्व्हिस, बालाजी सुपर मार्केट, बबलु सायकल व टायर शॉप,विटावा सूर्यनगर शंकर मंदिरजवळ येथीलकिराणा व जनरल स्टोअर्स ही दुकाने दुपारी १२ वाजता सुरू असल्याचे निदर्शनास आले असून या दुकानांवर कारवाई करुन ती सिल करण्यात आली आहे. सदरची कारवाई कळवा प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त  सचिन बोरसे यांनी केली.