ठामपा आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यातून १००० बेडचे रुग्णालय




ठाणे महापालिका आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यातून 


करोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार १००० बेडचे रुग्णालय


नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; 



ठाणे


 ठाण्यात येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. करोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर  या रुग्णालयाची निर्मिती होणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतील बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. अंकित ठक्कर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी उपस्थित होते.


करोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात १००० बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. या ठिकाणी ५०० बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.



 


 



 




 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image