रमजान ईद सर्वांनी आपल्या घरीच साजरी करावी- जिल्हाधिकारी

*रमजान ईद " हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा*


*जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन*


ठाणे


जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला असून कोव्हीड-19 चा जिल्ह्यातील प्रादुर्भाव पाहता आपल्या सर्वांच्या सुरक्षितते साठी रमजान ईद " हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


शासनाने दिनांक १ ९ मे रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून त्यामध्ये सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील . सर्व धार्मिक सभा, परिषदा बंद राहतील असे निर्देश दिलेले आहेत . त्यानुसार जिल्हाधिकारी ठाणे यांनी आदेश निर्गमित केलेले आहे. या अनुषंगाने जिल्हयातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात येते की , दिनांक २५ मे रोजी साजरा करण्यात येणारा " रमजान ईद " हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा. सोशल डिस्टसिंग पाळावे.प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मिडीया अथवा प्रत्यक्ष फोनव्दारे शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी   नार्वेकर यांनी केले आहे.