मजुर नसल्याने कोपरी उड्डाणपुलाचे काम रखडणार

मजुर नसल्याने कोपरी उड्डाणपुलाचे काम रखडणार


डोंबिवली


गेल्या दोन-तीन वर्षात मुंबईतील विविध पूलांच्या अपघातांमुळे डोंबिवलीतील पूलांचे बांधकामांच्या शास्त्रीय तपासण्या संबंधीत शासकीय यंत्रणाकडून करण्यात आल्या. त्यानुसार कोपर उड्डाण पूल, ठाकुर्ली रेल्वे पादचारी पूल,डोंबिवली स्थानकातील कल्याण टोकाकडील पूलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. गेले दोन वर्ष कल्याण दिशेचा पादचारी पूल बंद आहे. नवीन पादचारी पुलाचे काम रडत-खडत सुरु आहे. परंतु आता कोरोनाच्या भितीमुळे मजूर मिळेनासे झाल्याने कोपर उड्डाणपुलाचे पादचारी पुलाच्या कामावर गंडांतर आले आहे.  पुलाचे बांधकाम, गर्डरची कामे पूर्ण झाली असून पुढील काम मजुरांमुळे रखडण्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यानंतरच पादचारी पूलाचे काम सुरळीतपणे सुरु होईल अशी माहिती रेल्वे सुत्राकडून मिळत आहे. या परिस्थितीमुळे अजून किती महिने लाखो प्रवाशांची छळवणूक रेल्वे प्रशासन करणार अशी विचारणा डोंबिवलीतून होत आहे.


कोपर उड्डाण पूलाचे बांधकाम महापालिका रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने करीत आहे. या पूलाचे तोडकाम शुक्रवारपासून सुरु झाले. ठाकुर्ली पादचारी पूल एका रात्रीत उभा करण्यात आला. करोनामुळे टाळेबंदी सुरु असून उपनगरी रेल्वेला सुध्दा विराम मिळाला आहे. अशा वेळेस रेल्वे प्रशासन डोंबिवली स्थानकातील रखडलेल्या पूलाचे काम पुर्ण करेल अशी डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांना मानस होता, परंतु करोनाच्या भितीने आंध्र,कर्नाटक येथील मजूर पळून गेल्याने पूलाचे काम पावसाळ्यापर्यंत पुर्ण होणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशसानचा कयास आहे. कोपर पूलाचे तोडकाम करण्यात येत आहे. तोडकाम करण्यासाठी फारशा तांत्रिक बाबींची गरज नसते, मात्र,  पादचारी पूलासाठी अभियंता, तांत्रिक कर्मचारी, मजूर यांची गरज असते.



 


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image