कोरोनाचे संशयित असलेल्या चौघांना पळून जात असताना अटक
ठाणे
ठाणे ग्रामीण पोलिसांनी मुरबाडच्या सीमेवर ९ ए्प्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पकडली. सदर कार कोरोनाचे संशयित असलेल्या चौघांना घेऊन जात होती. या कारसह चौघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारमधून प्रवास करणा या मुलांच्या आईचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे. या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही कोरोना संशयित असून ते हायरिस्क कॉन्टॅक्ट'मधील असल्याचेही त्यांना माहित होते. त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास मुंबईतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते, अशी प्राथमिक माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आली.
घाटकोपर येथून अहमदनगरकडे जात असताना ते टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खरमाटे यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या कारला ताब्यात घेऊन पुन्हा घाटकोपर पोलिसांकडे त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता त्यांच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखिल केली जाणार आहे. घाटकोपर इथेच त्यांची चौकशी करून त्यांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दक्ष ठाणे ग्रामीण पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्यांच्या कारला मुरबाड सीमेवर रोखल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखल्याची माहिती पोलिसांनी दिली.