नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यावतीने गरजू गरिबांना धान्यरूपाने मदतीचा हात

नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्यावतीने गरजू गरिबांना धान्यरूपाने मदतीचा हात


प्रभागातील 3000 गाेरगरिब कुटुंबीयांना सेवा देण्याचा मानस


ठाणे 



काेराेना महामारीच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लाँकडाऊन असतांना अनेकांचे विशेषत: गाेरगरिबांचे खूप हाल हाेत आहेत. उत्पन्नाची सर्व स्त्राेत बंद असल्याने सामान्य नागरिकांना पाेट भरणेही कठीण झाले आहे. अशा या बिकट परिस्थितीत या गरिबांची व्यथा जाणून संन्माननीय आमदार संजयजी केळकर व अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाैपाडा प्रभागात नगरसेविका साै.प्रतिभा मढवी यांचेतर्फे गरजूंना धान्य, आटा,डाळ, कडधान्य,साखर,खाद्यतेल असे पँकेजचे वितरण करण्यात आले.  आज पहिल्या टप्प्यात मंत्री प्लाँट या भागापासून सुरूवात करून स्लम भागातील अंदाजे 3000 गरजू कुटुंबीयांपर्यत मदत पाेहचविण्याचा कयास असल्याचे ठाणे गाैरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाँ.राजेश मढवी यांनी मनाेगत व्यक्त केले..