कल्याण डोंबिवलीत सहा महिन्याच्या बाळासह कोरोना रुग्णांची संख्या २४
कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. 3 रुग्णापैकी एक रुग्ण हा डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा परिसरातील आहे.
या परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. परिसरातील नागरीकांनी घराबाहेर फिरु नये. घराबाहेर निघून फिरताना नियम तोडताना आढळून आल्यास संबंधितांच्या विरोधात पोलिस कारवाई केली जाईल अशा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे निकट सहवासित असलेली 60 वर्षीय महिला व सहा महिन्याचे बाळ हे कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील आहे.
कालर्पयत महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 21 होती. आत्ता त्यात नव्या 3 रुग्णांची भर पडली आहे. डोंबिवलीतील वादग्रस्त लग्न समारंभात उपस्थित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा अंती ही महिला बरी झाली आहे. तिला घरी सोडण्यात आले आहे. ही महिला धरुन यापूर्वी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णापैट कामजणांना तपासणी अंती घरी सोडण्यात आले आहे.