वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण

वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण,


 रँडम टेस्टींग करण्याचे आयुक्तांचे आदेश




ठाणे


वागळे प्रभाग समितीमधील झोपडपट्टी व दा़टलोकवस्तीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाधित परिसराचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून 5 विविध पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. दरम्यान या परिसरात रँडम टेस्टींग करण्याचे आदेशही श्री. सिंघल यांनी दिले आहेत.


       कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काल वागळे प्रभाग समितीमधील अनेक ठिकाणी पाहणी केली होती. या परिसरात झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच परिसरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी बाधित परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार वागळे प्रभाग समिती परिसरात सी. पी. तलाव, भटवाडी, किसननगर, पडवळनगर परिसरात या 5 विविध विशेष पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.


        सदरचे सर्वेक्षण ज्या ठिकाणी बाधित रूग्ण सापडले आहेत त्या परिसरातील नागरिकांनाच्या रँडम पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यामार्फत कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच परिसरातील कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने ही विशेष मोहीम रावबविण्यात येत आहे.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image