ठाणे शहरात गेल्या तीन दिवसात ९ रूग्ण कोरोनामुक्त
२२ एप्रिल पर्यंत एकूण २२ रूग्ण कोरोनामुक्त
ठाणे
ठाणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांत जवळपास ९ रूग्ण उपचारानंतर बे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २२ रूग्ण बरे होवून कोरोनामुक्त झाले आहेत.
ठाणे शहरामध्ये कोरोना बाधित रूगणांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजुला कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल ९ रूग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण २२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
या सर्व रूग्णांवर फोर्टीज, कस्तुरबा गांधी रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॅास्पीटल, सफायर हॅास्पीटल आदी विविध कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. या सर्व रूग्णांची १४ दिवसानंतर कोव्हीड चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान सर्व कोव्हीड रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करताना कोणतीही हयगय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
२२ एप्रिल पर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या -168
कोरोना बाधितांची संख्या-13
ठाणे महागरपालिका क्षेत्रामध्ये आज नवीन कोरोना बाधित रूग्णांचा
तपशील खालीप्रमाणे
1. पुरूष, वय 52, किसननगर, 3 भटवाडी, वागळे इस्टेट
2. महिला, वय 28, किसननगर-3, वागळे इस्टेट
3. महिला, वय-46, जानकीनगर, कळवा प्रभाग समिती
4. पुरूष, वय-38, ठाणे ग्रामीण कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती
5. पुरूष, वय-33 कोर्ट नाका, ठाणे
6. पुरूष, वय-49 वसंत लॅान, माजिवडा, वर्तकनगर प्रभाग समिती.
7. महिला, वय-31, कासारवडवली, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती
8. महिला, वय-50, लोकमान्य नगर,4
9. पुरूष, वय-43,
10. पुरूष, वय-33, कौसा
11. पुरूष, वय-63, मुंब्रा
12. पुरूष, वय-40,
13. महिला, वय-2, क्रांतीनगर, रोबोडी
आज एकूण मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या - 00
बरे होवून डिस्चार्ज झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या - 32
दिनांक 22-04-2020 रोजी डिस्चार्ज झालेल्या व्यक्तींची संख्या - 05
1. पुरूष, वय-31, कळवा प्रभाग समिती (होरायझन हॅास्पीटल) दाखल दिनांक-11-04-2020
2. मुलगी, वय 6, कळवा प्रभाग समिती (होरायझन हॅास्पीटल) दाखल दिनांक 8-4-2020
3. पुरूष, वय 32, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती दाखल दिनांक-कौशल्या हॅास्पीटल
4. पुरूष, वय – 72, वागळे (सिव्हील हॅास्पीटल) दाखल दिनांक 12-4-2020
5. पुरूष, वय-49, आनंदनगर (होरायझन हॅास्पीटल) दाखल दिनांक 13-4-2020
....................................................