ठाणे शहरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम युद्धपातळीवर सुरू
ठाणे
ठाणे शहरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम युद्धपातळीवर सुरू असून आजपर्यंत तब्बल 18,110 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास 1,81,100 लिटर औषधाची फवारणी करण्यात आली. शहरात निर्जंतुकीरणाची व्यापकता वाढविण्यासाठी 10 ट्रॅक्टर्स, 10 टँकर्स, 10 बोलेरो, 8 टाटा एस आणि 125 हातपंपासोबत युपीएल कंपनीचे 2 मोठे ट्रॅक्टर्स यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रात 10 हजेरीनिहाय 10 फायलेरिया निरीक्षक व महापालिचे 164 कर्मचारी, 80 ठेकेदार कामगार तसेच 15 ड्रायव्हर यांच्यामार्फत शहरात सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येत आहे.
आज आज रोजी 18,110 लिटर सोडियम
हायपोक्लोराईटचे 1:10 हे प्रमाण घेवून 1,81,100 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचे स्प्रेईंग प्रभाग समितीनिहाय शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले. शहरातील मोठ्या रस्त्यांवर वाहनांच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येत असून छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून छोट्या वाहनांचा वापर करून फवारणी करण्यात येत आहे.
कोरोना कोवीड-19 ची बाधा झालेला राहुल ठाकूर या रूग्णाची 14 दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा आहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना काल रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी कासारवडवली येथे राहणारे अभिषेक लवेकर यांना फ्रान्सवरून आल्यानंतर कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने दिनांक 12 मार्च रोजी कस्तुरबा गांधी हॅास्पीटल येथे चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. 14 दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते. त्याचबरोबर दोस्ती विहार येथे राहणारे राहुल ठाकूर यांनाही रूग्णालयातून काल दिनांक 7 एप्रिल रोजी डिस्चार्ज करण्यात आले आहे. राहुल ठाकूर यांना लंडनवरून आल्यानंतर 27 मार्चला फोर्टिज हास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 30 मार्चला त्यांना कोरोना बाधीत म्हणून घोषित करण्यात आले होते. 14 दिवसांनंतर कोरोना कोवीड 19 च्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना काल फोर्टिजमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या दोन झाली आहे.