गावी जाण्यासाठी मजुराच्या नव्या युक्त्या

गावी जाण्यासाठी मजुराच्या नव्या युक्त्या



 ठाणे 


कोरोनामुळे देशात टाळेबंदी लागू करण्यात आली असल्याने अनेक मजुरांना आपल्या गावी जाण्यात प्रतिबंध झाला.  मात्र शहरात अडकलेल्या मजूरांकडून अनेक युक्त्या लढविल्या जात आहेत. ठाण्यातील मोहम्मद हुसेन या मजूराने ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला चक्क ४० मजूरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा फोन केला. प्रत्यक्षात, या मजूरांपैकी कोणीही उपाशी नसल्याचे मंगळवारी उघड झाले.


ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला लोकपुरम, वसंत विहार येथील आशर बिल्डींग' या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ४० मजूर असल्याचा फोन ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आला होता. याठिकाणी हे सर्व मजूर उपाशीपोटी असून त्यांच्या जेवणाची सोय करावी, अशी मागणीही त्याने केली. त्याच्या फोनची गांभीर्याने दखल घेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी भेट दिली. मात्र, त्याने हा बनावट फोन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी चितळसर पोलिसांना त्यांनी माहिती दिली. तेंव्हा आपल्याला गावी जायचे असल्यामुळे हा फोन केल्याची प्रांजळ कबूली त्याने दिली. हे समल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी त्याला समज देऊन परिस्थितीचे गांभीर्यही पटवून दिले. त्याला समज दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image