कल्याण एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू राहणार

कल्याण एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू राहणार


किरकोळ विक्रीसाठी पाच ठिकाणे निश्चित


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय



कल्याण -


ग्राहकांची उडणारी झुंबड लक्षात घेता कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद करण्याचा आज निर्णय घेण्यात आला. फक्त घाऊक (होलसेल) बाजार सुरू राहणार असून शेतकरी, ग्राहक, व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कल्याणमध्ये पाच ठिकाणी दररोज किरकोळ भाजीपाला विक्री केंद्र सुर रहाणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, डीसीपी विवेक पानसरे, एपीएमसी सभापती कपील थळे यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी संपूर्ण व्यवहार बंद असले तरी जिवनावश्यक वस्तूंची अडचण भासू नये म्हणून बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र धान्य, भाजीपाला खरेदीसाठी कल्याण बाजार समितीमध्ये ग्राहकांची झुंबड उडत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन आजच्या बैठकीत किरकोळ मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू ठेवून किरकोळ भाजी खरेदीसाठी कल्याणमधील पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली. कल्याणमधील सुभाष मैदान, मॅक्सी ग्राउंड, फडके मैदान, वायले मैदान, डोंबिवली ९० फूट रोड या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. गरज वाटली तर आणखी बारा ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये डोंबिवली, टिटवाळा तसेच २७ गावांचा समावेश आहे.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image