भिवंडी : भिवंडीत बेकायदा रासायमिक गोदामांवर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्र्यांनी देऊनही भिवंडी महसूल विभागाकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. बेकायदा रसायनांची साठवणूक करत असल्याचे प्रकार भिवंडीत वाढले आहेत. वळगाव येथील गोदामावर मंगळवारी नारपोली पोलिसांनी छापा घालून २१ लाख ७४ हजार ५४० रु पयांचे विनापरवाना २२३ ड्रम जप्त केले. या प्रकरणी गोदाम मालकासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ थातूरमातूर कारवाया करून या माफियांना महसूल विभाग पाठीशी घालत असल्याचे चित्र भिवंडीत समोर येत आहे. या | बेकायदा रासायनिक गोदामांना आगी लागल्याच्या घटना राजरोस घडत असतानाही महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. प्रकाश मोहिते (३९) असे गोदाम व्यवस्थापकाचे नाव असून अरुण उर्फतानाजी शंकर पाटील असे गोदाम मालकाचे नाव आहे. त्यांनी वळगाव येथील भामरे कम्पाउंड येथे बेकायदा रसायनांचे २१ लाख ७४ हजार ५४० रु पयांचे विनापरवाना २२३ ड्रम ठेवले होते. ही माहिती नारपोली पोलिसांना मिळताच त्यांनी या गोदामावर छापा घालून विनापरवाना रसायनांचा साठा जप्त केला. गोदाम मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपस नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक पुष्पराज सुर्वे करीत आहेत
भिवडात रसायनाचा साठा जप्त