मुंब्रा-कौसा येथे शानू पठाण यांनी सुरू केले होलसेल मार्केट 

मुंब्रा-कौसा येथे शानू पठाण यांनी सुरू केले होलसेल मार्केट 



ठाणे


व्यापाऱ्यांकडून होणारी लुटमार लक्षात घेता मुंब्रा येथील चार ठिकाणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नगरसेवक अशरफ शानु पठाण यांच्या प्रयत्नाने होलसेल मार्केट सुरू करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करून याठिकाणी सामान्यजनांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर आव्वाच्या सव्वा केले आहेत. नागरिकांची होणारी ही लूट टाळण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शानु पठाण यांनी अमृतनगर शिवाजीनगर दर्गाह मैदान; घासवाला कंपाऊंड कौसा;  कौसा स्टेडियम ॲमेझॉन आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात समोरील जैन मंदिर येथे होलसेल मार्केट सुरू केले आहे. सकाळी आठ ते  11 या वेळेत हे मार्केट सुरू असते. सोशल डिस्टन्स इन ठेवून याठिकाणी व्यापारी जीवनावश्यक वस्तू विकत असल्याचे सानू पठाण यांनी सांगितले.