गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू- देवेंद्र फडणवीस

स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू 


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



ठाणे 
स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू व शासनाला ते करण्यास भाग पाडू असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री,राज्याचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडवणीस यांनी ठाणे हाऊसिंग फेडरेशनने गडकरी रंगायतन आयोजित केलेल्या मार्गदर्शन मिळाव्यात केले .
 तुडुंब भरलेल्या गडकरी रंगायतन मध्ये रविवारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात मंजूर झालेले स्वतंत्र प्रकरण आणि स्वयम् पुनर्विकास याविषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन  फेडरेशन ने केले होते स्वयम् पुनर्विकास संबंधी 13 सप्टेंबर च्या शासनाच्या मंजूर झालेल्या धोरणानुसार उपस्थित असलेल्या सोसायटीच्या सभासदांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वास्तुविशारद मकरंद पुरस्कर यांनी सविस्तर माहिती देऊन पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास यातील फरक आणि फायदे तोटे या बद्दल संपूर्ण माहिती दिली

यावेळी सीताराम राणे यांनी आपल्या भाषणामध्ये सतत तक्रार करणाऱ्या सभासदा बद्दल सोसायटीच्या सभासद  पदाधिकाऱ्यांचा मानसिक छळ होतो त्यामुळे खोट्या तक्रार करणाऱ्या  सभासदांवर कारवाईची आवश्यक असून तशी तरतूद करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे बिन भोगवटा शुल्क 1995 पासून त्यात कुठलीही वाढ झालेली नाही याबाबत ती व्हायला हवी असे आवर्जून मागणी त्यांनी केली.आमदार संजय केळकर यांनी  कोपरी ब्रिज साठी परवानगी आणि ठाण्यातील क्लस्टर ला मंजुरी हे फडणवीस सरकारचं काम आहे त्याचे श्रेय दुसऱ्या कुणी घेऊ नये असे म्हणत विरोधकांवर टीका केली.खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी जसा इमारतींचा पुनर्विकास होतो तसा राजकारण्यांचे सुद्धा राजकीय पुनर्वसन व्हायला हवं   बळजबरीने केलेले अतिक्रमण हे धोकादायक इमारती सारखे आहे कधी पडेल ते सांगता येत नाही म्हणून असे धोकादायक सरकार बाजूला करून  सत्ता लवकर आणावी असे सूचित केले त्याचबरोबर सीताराम राणे यांचे कौतुक करून हाउसिंग फेडरेशन करत असल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला व केंद्र सरकारकडे याबाबत काही कामे असतील त्याचा पाठपुरावा करण्यास आपण मदत करू त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांचे साठी त्रासदायक असणाऱ्या जीएसटी बाबत आपण नक्की अर्थमंत्र्यांची बोलून या विषयी मदत करू असे सांगितले .
स्वयम् पुनर्विकास च्या माध्यमातून संस्थानी कामकाज केल्यास घरांच्या वाढत्या किमती कमी होतील ग्राहकांना स्वस्तात घर मिळतील याबाबत  महत्वाची भूमिका महानगरपालिकेची असणार आहे एक खिडकी योजना त्याचबरोबर वेगवेगळ्या जाहीर केलेल्या सवलती महानगरपालिकेने  स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांना उपलब्ध करून द्यायला हव्यात त्यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठपुरावा करून त्याची पूर्तता करून घेऊ त्याचबरोबर सीताराम राणे यांनी तक्रार करणाऱ्या सभासदा  बाबत मांडलेल्या मुद्द्यांचा नक्की विचार करायला हवा कारण खोट्या तक्रारी करणाऱ्यांना किंवा तक्रारीचा उद्देश आयोग्य असणाऱ्यांना  न्यायालय सुद्धा दंड किंवा शिक्षा करते त्याच धर्तीवर अशा  तक्रारदारांसाठी  तरतूद करणे आवश्यक आहे ,गृहनिर्माण संस्था या व्यवसाय करणाऱ्या संस्था नसून सेवाभावी संस्था आहेत म्हणून त्यांच्यासाठी सहकार कायद्यात स्वतंत्र प्रकरणाची तरतूद करून दिलासा दिला आहे.असे  देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत जनतेने आम्हाला सत्तेत बसविले होते. मात्र, आम्हाला सत्तेत बसता आले नाही. नव्याने स्थापन झालेले हे सरकार किती काळ टिकेल माहित नाही. मात्र, तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करु असे त्यांनी सांगितले.
प्रथमच होणाऱ्या मार्गदर्शन मेळाव्यास ठाणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी मान्यवरांना पुष्पगुच्छ न देता फळ देऊन  स्वागत करण्याची नवीन पद्धत सिताराम यांनी सुरू केल्याचे दिसून आले