तिसरा महापौर जनसंवाद येत्या सोमवारी होणार

तिसरा महापौर जनसंवाद येत्या सोमवारी होणार



ठाणे,


नागरिकांना थेट समस्या मांडता याव्यात यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या महापौर जनसंवाद उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यातील तिसरा महापौर जनसंवाद येत्या सोमवारी म्हणजेच 16 मार्च रोजी सकाळी 11 .00 वा. महापा लिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार असून नागरिकांनी आपल्या नागरी समस्यांसह अर्धा तास आधी उपस्थीत रहावे असे आवाहन महापौर यांनी केले आहे.


            जानेवारी व फेब्रुवारी  महिन्यात झालेल्या महापौर जनसंवादात नागरिकांनी उपस्थीत केलेल्या समस्यांचा निपटारा वेळेत झाल्याने नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून महापौर यांचे आभार व्यकत्‍  केले. या उपक्रमात नागरिकांना महापालिकेचे पदाधिकारी तसेच प्रशासनातील विविध विभागातील  अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येत असल्यामुळे नागरी समस्या मांडणे सोपे जात आहे. मार्च महिन्यातील महापौर जनसंवाद हा येत्या सोमवारी (16 मार्च) होणार आहे. नागरिकांनी  आपल्‍या समस्या या लेखी स्वरुपात कार्यक्रमापूर्वी अर्धातास आधी नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.