त्या तरुणीचा मृत्यू घातक रसायनामुळेच....

त्या तरुणीचा मृत्यू घातक रसायनामुळेच....



ठाणे :


ठाण्यातील शरीरसौष्ठवपटू मेघना देवगडकर (२२) हिचा महिनाभरापूर्वी झालेला मृत्यू डायनीट्रोफिनॉल या घातक रसायनाच्या औषधामुळे झाल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून मनविसेचे ठाण्यातील अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ऑनलाइन औषधविक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर अन्न व औषध प्रशासन परिमंडळ-१ च्या सहा.आयुक्त माधुरी पवार यांनी पाचंगे यांना पाठवलेल्या उत्तरात हा खुलासा केला आहे. त्यांनी परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून आनलाइन औषध विक्री होत नसल्याचे म्हटले आहे.


मेघनाने प्राशन केलेले औषध आयुर्वेदिक नसून तिने जिममधील ट्रेनर योगेश निकमच्या बॅगेमधून घेऊन सेवन केल्याने तिचा आकस्मिक मृत्यू ओढवला असल्याचे प्राथमिक तपास व चौकशी अहवालावरून दिसल्याचे म्हटले आहे. सदर घटक असलेल्या औषधाच्या उत्पादन व विक्रीस केंद्र व राज्य शासनाची मान्यता नसल्याचेही या उत्तरात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पाचंगे यांनी आता ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन अशा प्रकारे अवैधपणे औषधविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी नौपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हा गुन्हा कल्याण पोलीस ठाण्यात वर्ग केला होता.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image