रुची सामाजिक संस्था, श्री तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सत्कार,
रुची सामाजिक संस्था, श्री तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सत्कार,


मराठी कलाकार सतीश नायकोडी, शिवाली परब, प्रणव भांबुरेचि विशेष उपस्थिती 

 




कल्याण

 

रुची सामाजिक संस्था आणि श्री तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने कल्याण पूर्व येथे महिलांकरिता जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगरसेविका शीतल मंढरी, भाजप कल्याण महिला अध्यक्ष उज्वला दुसाने, पत्रकार अमोल कदम, संजय मोरे, सुभाष म्हस्के दीपेश गायकवाड, प्रताप माने तसेच मराठी अभिनेता सतीश नायकोडी, प्रणव भांबुरे, विलास शिरसाठ, अभिनेत्री शिवाली परब यांची उपस्थिती होती. 

कल्याण परिसरातील बेरोजगार महिलाना रोजगार उपलब्द करून देऊन साक्षर बनविण्याकरिता रुची सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना लोखंडे यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत आतापर्यंत कित्येक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्द करून दिले आहेत. यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता जागतिक महिला दिनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार, हळदीकुंकू समारंभ आणि लकी ड्रॉचे आयोजन रुची सामाजिक संस्था आणि तिसरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कल्याण पूर्व येथील पार्वती सभागृह येथे केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता प्रणव अंबुरे, पत्रकार अमोल कदम, रुची सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना लोखंडे यांच्या हस्ते दीप प्रजोलनाने करण्यात आली.    

कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अभिनेता प्रणव अंबुरे, पत्रकार अमोल कदम यांचा देखील कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकार सतीश नायतोंडी यांनी क्राईम पेट्रोल या मराठी कार्यक्रमाची आठवण सांगून महिलांनी किती सावध राहायचे असे सांगितले. तसेच हिंदी सिनेमा कलाकार नाना पाटेकर, अमिताभ बच्चन यांची मेमक्री अभिनेता विलास शिरसाठ यांनी करून उपस्थित महिलांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रुची सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना लोखंडे, वंदना मोरे, अर्चना सूर्यवंशी, अलका साळवी, पल्लवी जाधव, पद्मिनी कदम, विद्या मोरे, यशोदा माळी, सीमा निचिते, कविता गाढवे, रजनी भोसले, प्रिया जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. 



Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image