दिव्यातील खाजगी दवाखाने सुरु करण्याचे आवाहन

दिव्यातील खाजगी दवाखाने सुरु करण्याचे आवाहन



ठाणे :


 दिवा प्रभागातील ६१ डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक मागील 3-4 दिवसांपासुन बंद ठेवले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत होते.सर्दी, खोकला अशा सामान्य आजारांवर तातडीने उपचारासाठी त्यांना कळवा रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. याची गंभीर दखल घेत दिवा येथील डॉक्टर असोसिएशन यांची बैठक मा.सौ.दिपाली भगत सभापती दिवा प्रभाग समिती यांचे कार्यालयात बोलवण्यात आली होती.  कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे क्लिनिक बंद ठेवले असल्याचे डॉक्टरांनी सदर बैठकीत सांगितले. यावर उपाय म्हणून त्यांना त्यांच्या सुरक्षेकरिता उमेश भगत यांनी मोफत HIV टेस्टिंग किट (use and throw) देण्याचे आश्वासन दिले.यावर सदर डॉक्टरांनी आपआपले क्लिनिक सुरु करण्याचे मान्य केले. या बैठकीस मा. उपमहापौर रमाकांत मढवी,  उमेश भगत व डॉ. सुनिल मोरे सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती इत्यादी उपस्थित होते. आजपासून डॉक्टरांनी आपले क्लिनीक उघडे ठेवण्यास सुरुवात केली असल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले. 



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image