ठाणे जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध
महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा तर विशेष समिती सभापती पदी कुंदन पाटील आणि संजय निमसे यांची निवड
ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली. तसेच उर्वरित दोन विशेष समित्यांच्या सभापतीपदी कुंदन पाटील आणि संजय निमसे यांची निवड झाली. या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) तथा सदस्य सचिव छायादेवी सिसोदे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
आज गोयंका इंटरनॅशनल स्कुल येथे कोव्हिडं १९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणूका संपन्न झाल्या. विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांनी अभिनंदन केले.
महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या रत्नप्रभा तारमळे ( शिवसेना) या खारबाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.तर समाज कल्याण सभापती पदी विराजमान झालेल्या नंदा उघडा (,भाजपा) या वैशाखरे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. तसेच विशेष समिती सभापती पदी निवडून आलेले कुंदन पाटील ( शिवसेना) हे पूर्णा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.तर संजय निमसे ( राष्ट्रवादी) हे चेरपोली गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.