नागरिकांकडून आलेल्या तक्रारीचे निरसन तातडीने करण्याच्या सूचना

नागरिकांकडून आलेल्या तक्रारीचे निरसन तातडीने करण्याच्या सूचना


ठाणे


ज्या ठिकाणी नादुरूस्त चेंबर्स कव्हर्स असतील तसेच ज्या ठिकाणी चेंबर कव्हर्स नसतील त्या ठिकाणी त्वरीत चेंबर्स कव्हर्सची दुरुस्ती किंवा नवीन कव्हर्स बसविण्यात यावे. पावसाळ्यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी होवू नये यासाठी शहरातील सर्व मुख्य रस्ते तसेच उपरस्त्यांच्या बाजूचे पदपथ आणि गटार यांची पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.


आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग समितीनिहाय चेंबर्सची झाकणे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नौपाडा-कोपरी, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा, माजीवडा, वर्तकनगर, लोकमान्य सावरकरनगर, वागळे प्रभाग समिती याक्षेत्रात एकूण 355 चेंबर्स झाकणे बसविण्यात येणार असून एकूण 236 ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित चेंबर्स बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. चेंबर्सच्या झाकणांअभावी कोणताही अपघात होऊ नये यासाठी त्याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच चेंबर्ससंदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारीचे निरसन तातडीने करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.