बसचे नियोजन नसल्याने कामावर जायचे कसे

बसचे नियोजन नसल्याने कामावर जायचे कसे


डोंबिवली


सोमवारपासून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, बसचे नियोजन नसल्याने नोकरदारांच्या त्रासात भर पडली आहे. बस येणार असे सांगूनही दूरपर्यंत एकही बस दिसत नव्हती, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून कामावर जायचे तरी कसे? आणि पुन्हा यायचे कसे? असा सवाल नोकरदारवर्गांनी केला आहे.  दिवस कसे काढायचे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसत होते


कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आजपासून कार्यालये, मंदिरांसह अन्य व्यवसाय सुरु करण्याची मुभा दिली आहे. यामुळे जीव धोक्यात घालून डोंबिवलीतील नोकरदार वर्ग कार्यालयात जाण्यासाठी तयार झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नियोजनाचा फज्जा उडालेला दिसून आला. डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे जवळपास दोन किमी पर्यंत रांग लागल्याचे दिसून आले.



 


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image