कोरोना मुक्तीच्या लढ्यात प्रसाद चिकित्साचे योगदान 
कोरोना मुक्तीच्या लढ्यात प्रसाद चिकित्साचे योगदान 

 


 

ठाणे

 

कोरोना मुक्तीच्या लढ्यात योगदान देण्यासाठी प्रसाद चिकित्सा या ठाणे आणि पालघर जिह्यातील एका अग्रणी संस्थेने आरोग्य प्रकल्पाबरोबरच ग्रामविकास प्रकल्पामार्पतसुध्दा विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत व यामध्ये मास्कचे व अन्नधान्याचे वाटप या दोन गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला जातो आहे. संस्थेने आतापर्यंत सुमारे 1000 कुटुंबाना साधारण पंधरा दिवस पुरेल एवढ्या कोरड्या शिध्याचे वाटप केले तसेच मास्कचे वाटप प्रत्यक्ष घरी जाऊन केले जात आहे. 

गुरुमाई चिद्विलासानंद सिध्दयोग मार्गाच्या आध्यात्मिक अधिष्ठात्री आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे. सिध्दयोग मार्गाचा मूळ आश्रम, गुरुदेव सिध्दपीठ, हा महाराष्ट्रातील गणेशपुरी इथे स्थित आहे. श्रीगुरुमाईंनी 27 जुलै, 1994 रोजी सिध्दयोग मार्गाची एक लोकहितकारी अभिव्यक्ती म्हणून प्रसाद चिकित्सा चॅरीटेबल ट्रस्टचा शुभारंभ केला. गेल्या 25 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून प्रसाद चिकित्साने निरनिराळ्या सामाजिक विकास कार्यक्रमांद्वारे आणि वैद्यकीय उपक्रमांच्या माध्यमातून तानसा खोऱयात राहणाऱया, अर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायांची सेवा केली आहे. 

 

Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image