डॉ. जितेंद्र आव्हाडांमुळे खारीगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारीगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण


ठाणे


सध्या कोरोनामुळे अनेकजण प्राण सोडत असतानाच एका व्यक्तीने चक्क 15 दिवस व्हेटिंलेटरवर राहून कोरोनावर मात केली आहे. गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांनी आयत्यावेळी रेमडिसिव्हीर हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले असून २० दिवसानंतर ही व्यक्ती घरी परतली आहे.  थोडा ताप येत असल्याने खारीगांव येथे राहणार्‍या श्री राजेश रतन पाटील यांना मानपाडा(ठाणे) येथील मेट्रोपोल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.


कोविड टेस्ट केल्यानंतर ते कोरोनाबाधीत असल्याचे आढळले. मात्र शहरातील अनेक कोविड रुग्णालयांमध्ये विचारणा करुनही बेड उपलब्ध होत नसल्याने अखेर श्री.पाटील यांचे बंधू श्री. नितीन रतन पाटील आणि श्री.महेश जगदीश पाटील यांनी आमदार श्री.जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर श्री. राजेश रतन पाटील यांना ५ जून रोजी मेट्रोपोल हॉस्पीटलमध्ये दाखल केले परंतु नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉ. पांडे यांनी प्रचंड मेहनत घेऊन श्री.पाटील यांची प्रकृती स्थिर केली. मात्र रेमडिसिव्हीर या सहा इंजेक्शनची आवश्यकता होती. ही इंजेक्शन्स ठाण्यात मिळत नसल्याने हतबल झालेल्या श्री.महेश जगदीश पाटील आणि श्री.नितीन रतन पाटील यांना श्री.आव्हाड साहेब यांनी तत्काळ ही इंजेक्शन उपलब्ध करुन दिली. त्यामुळेच केवळ श्री राजेश रतन पाटील यांचा जीव वाचला आहे. दरम्यान,श्री राजेश पाटील यांना काही दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आलं. घरी परतल्यानंतर ते रहात असलेल्या ठिकाणच्या नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब आणि डॉ.राहुल पांडे यांच्यामुळेच आपण  आज हे जग पाहत असल्याची प्रतिक्रिया श्री राजेश रतन पाटील यांनी दिली.